vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यातील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

जिल्ह्यातील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

 

बुलडाणा, प्रतिनिधी : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या राज्याबाहेर प्रक्षेत्र भेटी आयोजित करण्यात येतात. यातून जिल्ह्यातील 28 शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी बेंगलोरकडे रवाना झाले.

 

अभ्यास दौरा हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टीकल्चर हिसारगड, बेंगलोर येथे आहे. सदर अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील २८ शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी मंगळवार, दि. २० फेब्रुवारी रोजी रवाना झाले. अभ्यास दौऱ्यात बेंगलोर येथील प्रक्षेत्र भेट, फलोत्पादन विषयक विषयांचे व्याख्यान, तसेच बेंगलोर येथील प्रगतीशील शेतकरी यांच्या शेतावर भेटी देण्यात येणार आहे.

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांचे राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत राज्यात फळ उत्पादक शेतकरी, तसेच शेतकऱ्यांमध्ये उत्पादनविषयक जिज्ञासा व आवड निर्माण करणे हा हेतू आहे. तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी व शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेचा अभ्यास करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञान व काढणी पश्चात तंत्रज्ञान बाबत सखोल व शास्त्रोक्त पद्धतीने ज्ञान उपलब्ध करून देणे, फलोत्पादन विषयक शेतीचा विकास करणे, यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निवड ईश्वर चिठ्ठीने झाली असून तालुका बुलढाणा, चिखली, मोताळा, खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथील शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

 

00000

संबंधित पोस्ट

जालना शहर महापालिका प्रशासनाचे लेखी आश्‍वासन शौला चौकातील मयुर अग्रवाल, गणेश लुटे यांचे उपोषण तुर्त मागे..

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी..

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta