
सुधागड तालुकास्तरीय सर्व माध्यमिक शाळांच्या भव्य क्रीडा स्पर्धा
राज्य क्रीडा प्रतिनिधी
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल आयोजित दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२४ रोजी तालुक्यातील 14 माध्यमिक शाळेंतील मुले व मुली यांच्या वयक्तिक भव्य क्रीडा स्पर्धा ग. बा. वडेर स्कूल पाली येथे खालील प्रकारांत घेण्यात आल्या
1)लांब उडी, 2)उंच उडी, 3) थाळी फेक, 4)गोळा फेक, 5)१०० मीटर धावणे, 6)२०० मीटर धावणे, 7) ४०० मीटर धावणे, 8)पुलअप्स,
9) ४x १०० मीटर रिले
वरील कार्यक्रमासाठी प्रस्ताविक ग. ब. वडेर चे शिक्षक श्री सुजित जगताप यांनी करताना सांगितले की, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे संस्थेने मागील 9 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, पितृछत्र हरपलेल्या व गरीब विद्यार्थ्यांची फी अशी विविध प्रकारची मदत केली करीत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे कार्य केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धनंजय साजेकर, अध्यक्ष सुधागड तालुका मराठा समाज यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी जी मदत मिळत आहे त्याचा योग्य उपयोग करून त्याची गुणवंता वाढवावी असे आवाहन केले, तसेच खेळामध्ये मिळणाऱ्या विविध करिअर यांचे मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विठ्ठल घाडगे यांनी सांगितले की, आम्ही ज्या वयक्तिक क्रीडा स्पर्धा आयोजित करतो त्याचे कारण की विद्यार्थाना सैनिक, पोलीस व विविध सरकारी संरक्षण क्षेत्रांत नोकरीच्या संधी मिळावी. तसेच इयत्ता 8 वी ते 10 च्या मुलांना Education व Career मार्गदर्शन सुरू केले आहे, त्याचा उपयोग विद्यार्थी आपल्या आवडीचे करिअर निवडण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. कार्यक्रमास सुधागड education संस्थेचे सचिव श्री घोसाळकर सर, संचालक श्री रमेश साळूके साहेब, संस्थेचे सल्लागार श्री विठ्ठल खेरटकर, वसंत लहाने तसेच सर्व शाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवस आयोजित स्पर्धेत 140 मुले व 160 मुलीने सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या.
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री बळीराम निंबाळकर सर संस्थेचे समन्वयक, श्री सुजित जगताप सर, श्री मोहन म्हात्रे सर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच ग.बा. वडेर शाळेचे प्राचार्य श्री घोडके सर, सर्व शाळेचे प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले, या सर्वाचे व सहभागी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे तर्फे आभार.



