vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबा यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबा यात्रेसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

 

बुलडाणा, प्रतिनिधी : सैलानी येथे येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीकोना ट्रस्ट आणि प्रशासनाने कार्य करावे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रामुख्याने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि सुरक्षा आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सैलानी यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी शरद पाटील, गटविकास अधिकारी सरीता पवार यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दर्गा, संदल, मुख्य रस्ता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. पोलिसांचे 35 आणि ट्रस्टचे 25 कॅमेऱ्याचे नियंत्रण एकाच कक्षातून करण्यात यावे. तसेच या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा. तसेच याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मुबलक पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी व्यवस्था करण्यात यावी. जवळच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करावेत. या पाण्याचे नमूने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्यास सदर टॅंकर हे स्वच्छ आणि सुस्थितीतील असावेत.

 

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. तसेच नागरिकांनी शौचालय आणि स्नानगृहाचा उपयोग करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. दर्ग्याजवळ करण्यात येणाऱ्या बळीसाठी दुसरी जागा देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्ग्याजवळ अशा प्रकारांना परवानगी देण्यात येऊ नये. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घो‍षित करावा. यात्रेदरम्यान होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

00000

संबंधित पोस्ट

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मतदान जनजागृती मल्टीमिडीया चित्रप्रदर्शनाचे धुळे जिल्ह्यातील आमळी येथे उद्धाटन

vishwatmaklokswamivarta

कर्णपूरा यात्रेचा शांतता व सुरक्षित वातावरणात आनंद घ्यावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

ग्रामविकास विभाग बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

26 /11 मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहिदांच्या कुटुंबियांचा दिव्याज फाउंडेशन तर्फे सत्कार, श्री श्री रविशंकर यांना आतंरराष्ट्रीय शांतता पुरस्कार…

vishwatmaklokswamivarta

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याचे आवाहन

मीरा भाईंदर क्षेत्रात कॅन्सर रुग्णालयासाठी निधी कमी पडू देणार नाही    – मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta