vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याचे आवाहन

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण, परीक्षा शुल्क अर्ज भरण्याचे आवाहन

 

बुलडाणा, : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांना mahadbt.mahait.gov.in पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. या प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 25 जुलै 2024 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संस्था, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विजाभज, इमाव, व विमाप्र जाती प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

 

मागील वर्षाच्या तुलनेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कमी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजाभज, इमाव व विमाप्र जाती प्रवर्गातील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अर्ज तातडीने भरावेत. तसेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अर्ज रिअप्लाय करण्यासाठी दि. 31 मार्च 2025 मुदतीत अर्ज रिअप्लाय भरण्यात यावे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी विजाभज, इमाव व विमाप्र जाती प्रवर्गातील योजनेस पात्र विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर दि. 31 मार्च 2025 पर्यत अर्ज भरावेत. तसेच महाविद्यालययाचे प्राचार्यांनी महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या विजाभज, इमाव, व विमाप्र जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी भरुन घ्यावे.

 

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महावि्दयालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदनपत्रे भरण्याबाबत सूचना देण्यात यावी. महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. विहित मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहणार आहे. त्यामुळे महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन सहायक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पुरेशा लससाठ्याअभावी दिनांक १९ आणि २० ऑगस्ट २०२१ मुंबईतील शासकी,महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद,शनिवार दिनांक २१ ऑगस्ट २०२१ रोजी होणार लसीकरण**

खरीप 2025 हंगामासाठी अन्नधान्य व वाणिज्यिक पिके व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत पिकांच्या अनुदानावरील प्रमाणित बियाण्यांकरिता अर्ज करावेत

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे-कृषी संलग्न विभागांचा सविस्तर आढावा ; कृषी विभागाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त

vishwatmaklokswamivarta

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा  इशारा; अनेक भागात गारपीट ..

पुणे शहरात आता गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रो २५ जुलै दरम्यान धावणार. सुरू आहेत चाचण्या. प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ.