vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) अन् मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाटीवर आलं आईचं नाव…

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) अन् मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या पाटीवर आलं आईचं नाव…

 

 

 

             मुंबई, प्रतिनिधी: मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी आज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेत दालनाबाहेर एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे अशी पाटी लावली आहे.

 

यापुढे शासकीय दस्तऐवजावर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची, असे ठरवले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे करण्यात आले आहे.

 

माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो. तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

मी मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’, असे नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे सेल्फीव्दारे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित लाल किल्ल्यावर  9 व्यांदा ‘तिरंगा’ फडकवला. ही परंपरा पुढे चालू ठेवत ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा अभिमानाने आणि गौरवाने फडकत आहे. आपल्या मातीत खूप सामर्थ्य आहे.

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करा-कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे

बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर…