vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

उक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची २१ हजाराची मदत

उक्कडगावच्या आशा स्वयंसेविकेस ‘समृद्धी’ची २१ हजाराची मदत

 

जालना प्रतिनिधी:घनसावंगी तालुक्यातील उक्कडगाव येथील आशा कार्यकर्त्या संजिवनी वाव्हळे याच्यां मुलीच्या लग्नासाठी समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी २१ हजाराची मदत केली. कारखान्याचे संचालक दिलीप मामा फलके यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली.

 

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका व गट प्रवर्तकांसाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी शुभमंगल कन्यादान योजना सुरु केली आहे. या योजनेंअंतर्गत आशा व अंगणवाडी सेविकेंच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी कारखाना २१ हजाराची मदत कन्यादान म्हणून करतो.उक्कडगाव येथील आशा कार्यकर्त्या संजिवनी वाव्हळे याच्यां मुलीच्या लग्नासाठी शुभमंगल कन्यादान योजनेंतर्गत २१ हजाराची मदत करण्यात केली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय तौर, वधूपिता संजय वाव्हळे, ऊस पुरवठा अधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.यावेळी वधूपिता संजय वाव्हळे यांनी मदतीबद्दल घाटगे यांचे आभार मानले.

——————

संबंधित पोस्ट

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचाही होणार शुभारंभ

हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन संपन्न

विशेष वृत्त :संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला गोदरेज कन्झ्युमर कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद· एम्बेड प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात लक्षणीय यश

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतीबा फुले , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातेमा शेख यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा! मॉ सेवाभावी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेची मागणी..

एनसीआय’ मध्यभारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर *- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*