
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 202418-जालना लोकसभा मतदार संघाकरीताआज 23 नामनिर्देशन पत्रांची विक्री 5 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र केले दाखल
जालना , प्रतिनिधी:- 18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 12 जणांनी 23 नामनिर्देशन पत्र खरेदी केले. आज दि. 22 एप्रिल अखेर उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी एकूण 77 जणांनी 186 फॉर्म घेतले. आजपर्यंत एकूण 5 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
आज मंगेश संजय साबळे, अपक्ष यांनी 3 नामनिर्देशन पत्र, धनंजय रुपराव काकडे यांनी भारतीय जवान किसान पार्टीच्यावतीने 1 आणि अपक्ष म्हणून 1, भास्कर बन्सी मगरे यांनी शिवसेनेच्यावतीने 1 व अपक्ष म्हणून 1, भगवान साहेबराव रेगुडे यांनी हिंदुस्थान जनता पार्टीच्यावतीने 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभाग, जालना यांनी कळविली आहे.
***



