vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

न्याय पालिकेतील कर्मचाऱ्यांची मतदार प्रतिज्ञा कर्मचारी, नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी

न्याय पालिकेतील कर्मचाऱ्यांची मतदार प्रतिज्ञा कर्मचारी, नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी

 

 

राज्य प्रतिनिधी

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी न्यायपालिकेंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. तसेच आपले कुटुंबीय आणि आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी केले.

 

भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या ‘सुनियोजित मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ या प्रमुख कार्यक्रमांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमधून मतदार जागरूकता मंचाची स्थापन करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकामध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक साक्षरता आणि सहकार्यता निर्माण करण्यासाठी हा फोरम महत्वपूर्ण आहे.

 

या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 22 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील न्यायालयांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्या मार्गदर्शनाखाली एकाचवेळी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश राजेंद्र मेहरे, संजय डिगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन, तसेच दूरचित्रवाणी परिषदेच्या माध्यमातून तालुकास्तरावरील सर्व न्यायालयाचे न्यायधीश, कर्मचारी आणि विधिज्ञ उपस्थित होते.

 

सुरुवातीला सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या माझे मत, माझा आवाज या नागरिकांना करण्यात आलेल्या मतदानविषयक आवाहन संदेशाचे प्रक्षेपण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल बी. एम. मोहन यांनीही मतदान करण्याबाबत सर्वांनी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश संजय डिगे यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली. जिल्हा प्रणाली प्रशासक प्रदिप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

संबंधित पोस्ट

मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा – माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) दि. २२.०५.२०२५ सकाळी ८:३० वाजेपर्यंत..

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथील जाहीर सभेत ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा…; राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्र जिल्ह्यातील क्लोरीन वॉश अभियान यशस्वी करावे- जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना

दिवाळीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहिम;अन्नपदार्थ खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta