vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

दिल्लीतील 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी: नेटफ्लिक्स वर वेब सिरीज पाहून रचला होता कट…

15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी: नेटफ्लिक्स वर वेब सिरीज पाहून रचला होता कट…

 

[ गुन्हे वार्ता

: दिल्लीतल्या 15 वर्षांच्या कुणाल शर्माच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेने  संपूर्ण देश हादरला होता. ग्रेटर नोएडातले हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एमबीबीएसच्या विद्यार्थिनीसह चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या कबुली जबाबात हादरवणारी माहिती समोर आली आहे. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी नेटफिल्क्सवर  नावाची वेबसीरिज पाहून हे हत्या प्रकरण घडवून आणलं.

 

का केली कुणालची हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना कृष्णा शर्मा यांच्या हॉटेवर कब्जा करायचा होता. याशिवाय आरोपी आणि कृष्णा शर्मा यांच्यात पैशांवरुनही वाद सुरु होता. त्यामुळे बदला घेण्याच्या इराद्याने आरोपींनी कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांचा मुलगा कुणालच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला. या संपूर्ण कारस्थानात एमबीबीएसची एक विद्यार्थिनीचाही समावेश होता. या मुलीचा फोटो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओत कुणाल एका मुलीबरोबर कारमध्ये बसताना दिसत आहे.

हॉटेलवर कब्जा करण्यासाठी कट

पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा केला आहे. कृणालच्या हत्येचा कट त्याचा काका आणि एका तरुणाने रचला होता. या पैकी तरुणाने कृष्णा शर्मा यांच्याकडून व्याजावर अडीच लाख रुपये घेतले होते. तर काकाला कृष्णा शर्मा यांच्या हॉटेलवर कब्जा करायचा होता. या दोघांनी आपल्या कटात एबीबीएस शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला सहभागी करुन घतेलं. यात मुलीने आपल्या कारने कुणालला गोड बोलून आपल्या कारमध्ये बसवलं आणि त्याचं अपहरण केलं.

कुणालचं अपहरण केल्यानतंर आरोपींनी त्याचे हात-पाय बांधले आणि त्याला एका बॅगेत भरलं. यानंतरत्याला कारने दिल्लीच्या सेक्टर 127 मधल्या जेपी विश टाऊन इमारतीतील एका प्लॅटमध्ये नेलं. त्याच दिवशी त्याच फ्लॅटमध्ये आरोपींनी 15 वर्षांच्या कुणालची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये ठेऊन बुलंदशहरमध्ये नेला. तिथे एका कारमध्ये त्यांनी कुणालचा मृतदेह फेकला.

वेबसीरीज पाहून हत्याकांड

आरोपींनी संपूर्ण हत्याकांड एक वेबसीरिज पाहून रचली. नेटफिल्क्सवरची HIT नावाची एक वेबसीरिज त्यांनी पाहिली. त्यानंतर आरोपींनी कारची नंबर प्लेटही बदलली. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडीची नंबर प्लेट बदलली.

 

ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा भागात राहाणाऱ्या हॉटेल व्यावाी कृष्ण कुमार शर्मा यांचा 15 वर्षांचा मुलगा कुणालचं अपहरण झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कुणालच्या शोधसाठी पोलिसांनी अनेक पथकं बनवली होती. तसंच अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. अपहरण आणि हत्येच्या चार दिवसांनंतर पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलं.

 

संबंधित पोस्ट

अमरावतीतील युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेत 59 लॉकर्समध्ये सुमारे 3.5 कोटी रुपयांच्या खऱ्या सोन्याच्या दागिन्यांऐवजी आता बनावट सोन्याचे दागिने सापडले आहेत

एक कोटी रुपयांच्या 500 एमडी ड्रग्जसह दोघांना अटक, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभगाची कारवाई

vishwatmaklokswamivarta

शिवडीतील जैन मंदिरात चोरी उघडकीस, तीन आरोपींना अटक, ७.१५ लाखांचे दागिने जप्त:-आर ए के मार्ग पोलिस.

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर कल्याणमध्ये सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून चौघांना अटक

बनावट आधारकार्ड व्दारे ॲमेझॉन व पिलपकार्ट कंपनीस गंडा घालून त्यांची फसवणुक करणाऱ्या उच्चशिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांना डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशन कडुन अटक.”

vishwatmaklokswamivarta

बनावटीच्या दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाने  भरारी पथकाची मोठी कामगिरी; साडे सात लाखांची बनावट दारू जप्त

vishwatmaklokswamivarta