
निवृत्तीवेतनधारक/कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन
सातारा प्रतिनिधी: कोषागारामार्फत निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन/सुधारित निवृत्तीवेतन/कुटूबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणा-या रकमेबाबत कोषागारामार्फत फोन करुन प्रत्यक्ष संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सुचित केले जात नाही. याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही.
यापूर्वी सदरबाबत वृत्तपत्रामधून आवाहन केलेले असतानाही ऑनलाईन फसवणूकीबाबतची पुनरावृत्ती झालेली आहे. तरी याद्वारे आपणास पुनश्च आवाहन करण्यात येते की, आपणास दूरध्वनी/भ्रमणध्वनीवरुन उपरोक्त प्रदानासंदर्भात संपर्क साधुन रक्कम ऑनलाईन, गुगल पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याविषयी सांगण्यात आले तर आपण तात्काळ जिल्हा कोषागाराशी संपर्क साधावा व खात्री करुन घ्यावी याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकाची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी, असे सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत जिल्हा कोषागार अधिकारी व अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांनी कळवीले



