vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी पुर्ततेकरीताआता 20 ते 22 मे रोजी विशेष मोहिम

जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटी पुर्ततेकरीताआता 20 ते 22 मे रोजी विशेष मोहिम

 

 

 

सांगली प्रतिनिधी: ग्रामपंचायत निवडणूक ऑक्टोबर 2023 मध्ये राखीव प्रवर्गावर निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केला आहे, तथापी त्रुटी पुर्तता केली नाही अथवा समिती कार्यालयाशी संपर्क केला नाही, अशा उमेदवारांकरीता तालुकानिहाय विशेष मोहिम दि. 22 व 23 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या विशेष मोहिमेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता वाळवा-इस्लामपूर, शिराळा व तासगाव तालुक्यासाठी 20 मे, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूस व आटपाडी तालुक्यासाठी 21 मे तर मिरज, खानापूर-विटा व जत तालुक्यासाठी 22 मे रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली येथे विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली चे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बाळासाहेब कामत यांनी दिली.

 

संबंधित सर्व उमेदवारांनी / अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत मुळ कागदपत्रांसह स्वत: उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. कामत यांनी केले आहे.

 

 

 

00000

संबंधित पोस्ट

जालना शहरातील सर्व नागरिकांना सूचना- जालना महानगरपालिका

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना समितीच्या अध्यक्षपदी सतीश घाटगे

शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित* 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

vishwatmaklokswamivarta

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा..