vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सतीश घाटगे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला मोसंबी फळबागायतदाराना भरपाई देण्याची मागणी : 

सतीश घाटगे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला मोसंबी फळबागायतदाराना भरपाई देण्याची मागणी :

 

जालना प्रतिनिधी: यंदाच्या उन्हाळ्यात घनसावंगी व अंबड तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य पाहायला मिळाले. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोसंबीसह इतर फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा नेते सतीश घाटगे यांनी सोमवारी केली.

 

दुष्काळात होरपळून जळलेल्या मोसंबी बागांची सतीश घाटगे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धडपड करून लाखो रुपये खर्च करूनही आपल्या मोसंबी बागा यंदाच्या दुष्काळात वाचवू शकले नाही. शेतकऱ्यांची अनेक वर्षाची मेहनत वाया गेली असून लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीने भरपाई देण्याची मागणी सतीश घाटगे यांनी केली असून भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे उपस्थित होते.

 

 

 

प्रतिक्रिया

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक : निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाप्रलंबित प्रकरणांचे निराकरण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महानिर्मितीचा २५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा- पोलीस अधीक्षक अमोल तांबे· विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन· कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन

नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण  सतर्कतेने कामकाज करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी