vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ:: 1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या! [

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ:: 1800 रुपयांनी महागली चांदी, सोन्याच्या दरातही वाढ; 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव जाणून घ्या!

[

व्यावसायिक प्रतिनिधी: जून महिन्याच्या सुरुवातीला सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता गेल्या दोन दिवसांपासून सोनं पुन्हा महागले आहे. शुक्रवारी सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्यानं उसळी घेतल्याचे समोर आले आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 67,600 रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्या सोबतच सराफा बाजारात चांदीदेखील महागली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

 

शुक्रवारी चांदी 1800 रुपये प्रति किलोने वाढून 93500 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. तर 6 जून रोजी चांदी 91,700 रुपये इतकी होती. आंतराराष्ट्राय घडामोडीचे पडसादामुळं सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती सारखीच राहणार असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच, जून महिन्यात लग्नसराई कमी सराईचे दिवसही कमी असल्याने भारतात सोन्याच्या दागिन्यांची खरेदीही थंडावली आहे. बाजारातील ट्रेडनुसार यापुढेही किंमतींमध्ये चढ-उतार कायम राहतील, असं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

7 जून रोजी सराफा बाजारात 18 ते 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बाजार उघडताच 18 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांना वाढून प्रति 10 ग्रॅम 55 हजार 310 रुपये इतका झाला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 300 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 67,600 रुपये इतका झाला आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 330 रुपयांनी वाढून73,750 इतका झाला आहे.

 

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 67, 600 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 73,750 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 55, 310रुपये

 

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 6,760 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 7,342 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 5,531 रुपये

 

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 54, 080 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 59,000 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 44,248 रुपये

 

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 67, 600 रुपये

24 कॅरेट- 73, 750 रुपये

18 कॅरेट- 55, 310 रुपये

संबंधित पोस्ट

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये-19 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जानकी महोत्सव -2026 व मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन;नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी येताना सर्व आवश्यक कागदपत्रांसह यावे-जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

31 ऑक्टोंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta