
आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसह मंत्रिमंडळात सामील मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ..
नवी दिल्ली प्रतिनिधी
18व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इतर मंत्र्यांचा सोहळा सुरू आहे
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता 18व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी सरकार 3.0 चा शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसह मंत्रिमंडळात सामील मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत. या सोहळ्याला देश-विदेशातील जवळजवळ 8,000 लोक उपस्थित होते. तत्पूर्वी मोदींनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर ते अटलजींच्या समाधी आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली.
मोदी 3.0 मध्ये अनेक जुन्या मंत्र्यांसह नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. नरेंद्र मोदींनंतर राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. अमित शाह यांच्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नितीन गडकरी यांना शपथ दिली. त्यानंतर निर्मला सीतारामन, एस.जयशंकर, मनोहर लाल, एचडी कुमार स्वामी यांनी शपथ घेतली. नरेंद मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी, प्रताप राव जाधव, रक्षा खडसे, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांची शपथ घेतली आहे



