vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ओबीसी आरक्षण :ओबीसी संंघटनांकडून अंबड बंदची हाक, शहरातील दुकानांना टाळं, रस्त्यांवर शुकशुकाट

ओबीसी आरक्षण :ओबीसी संंघटनांकडून अंबड बंदची हाक, शहरातील दुकानांना टाळं, रस्त्यांवर शुकशुकाट

 

[ राज्य प्रतिनिधी

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. काल ओबीसी आंदोलकांनीआक्रमक होत धुळे सोलापूर महामार्गावरती टायर जाळून निषेध केला. लक्ष्मण हाके यांची प्रकृती ढासाळत असताना सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप ओबीसी आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे काल ओबीसी संघटनांनी अंबड शहर बंदची हाक दिली, आज या ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

 

अंबड शहरांमध्ये आज बंदची हाक दिल्यानंतर या ठिकाणी दुकाने बंद करून ओबीसी आंदोलनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी आंदोलकांनी सरकारकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असून सरकारची अशीच भूमिका राहिली तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे.

 

हिंगोलीमधून हजारो ओबीसी समाज बांधव वडीगोद्रीकडे रवाना-

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केला आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावाच्या दिशेने निघाले आहेत लक्ष्मण हाके यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे ओबीसी समाज बांधव हिंगोलीकडे निघाले आहेत

 

ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल

वडीगोद्री जवळ धुळे सोलापूर महामार्गावर टायर जवळून रास्ता अडवल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे दाखल, वडीगोद्री आणि जामखेड फाट्यावर आंदोलकांनी काल टायर जळून निषेध व्यक्त केला होता. गोंदी आणि अंबड पोलीस ठाण्यात 6 ज्ञात आणि 30 ते 31अज्ञात आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैर कायदा मंडळी जमा करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचा घोटाळा: हाके

लक्ष्मण हाके यांनी राज्यात कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात 57 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. कुणबी दाखले कोणत्या अधिकारात आणि कोणत्या निकषावर दिले हे आम्हाला शासनाने सांगावं. मनोज जरांगे पाटील म्हणतात की, मी 80 टक्के मराठ्यांना ओबीसीत घुसवले आहे. हे जर खरं असेल तर ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण झालेले आहे. मग राज्य सरकार ओबीसी आरक्षणाचे रक्षण कसे करणार, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला होता.

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र १ हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील — जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी, पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत की नाहीत?, याची चाचपणी शहरातील शाळांनी सुरु केली.

vishwatmaklokswamivarta

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; ‘सामना’वर ‘प्रहार’ करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल.

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

मतदान यंत्र तपासणी कार्यक्रम  सुरू२१ ते २३ जुलै दरम्यान चालणार प्रक्रिया