vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना महानगरपालिकेच्‍या महिला बचतगटाव्दारे उत्पादित सॅनिटरी पॅड निघाले गुजरात व मध्यप्रदेशला

जालना महानगरपालिकेच्‍या महिला बचतगटाव्दारे उत्पादित सॅनिटरी पॅड निघाले गुजरात व मध्यप्रदेशला

 

 

राज्य प्रतिनिधी

महानगरपालिका जालना, अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटाद्वारे निर्मीत व उत्पादीत कापडी पुनःरवापर करता येणारे व वापरण्यासाठी सहज असणारे सॅनिटरी पॅड तयार केले जातात या पॅडसाठी गुजरात व मध्यप्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर मागणी असून या मागणी अंतर्गत आज मा. आयुक्त श्री. संतोष खांडेकर यांच्या हस्ते व मा. उपायुक्त श्रीमती नंदा गायकवाड मॅडम यांच्या उपस्थिती 4000 पॅड ची पाहिली ऑर्डर मध्यप्रदेश मधील खरगोन जिह्यात दिव्य ज्योती सामाजिक विकास केंद्र येथे पहिली खेप पाठविण्यात आली. याप्रसंगी बोलताना मा. आयुक्त श्री.संतोष खांडेकर साहेब म्हणाले की, या पुनःरवापर करता येणारे पॅड सर्व महिलांनी वापरावेत तसेच स्थानिक पातळीवरही याची मोठ्या प्रमाणत जनजागृती करून जास्तीत जास्त महिलामध्ये जनजागृती करुन याचा वापर वाढवावा यामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत होइल व पूर्णपणे कपड्याचे पॅड असल्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे ही सोपे होइल. या कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक श्री. विजय फुलंब्रीकर तसेच विभाग प्रमुख श्री. घोळवे व एनयुएलएम विभागाचे कर्मचारी यांच्यासह उजास प्रकल्पात काम करणाऱ्या बचत गटातील महिला व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या पूनम ढोबळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने-घनसावंगी येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन.· नागरिकांनी महामेळाव्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळआणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह अनेक भागांत जोरदार मुसळधार पावसाचा इशारा

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीचा शिबिर दौरा 

कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी प्रवासी बसच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta