vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

 🚩 !!श्री वडवाळसिध्दनागेश!! 🚩  श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी   श्रीक्षेत्र वडवाळ 卐श्री तीर्थक्षेत्र वडवाळ卐

     🚩 !!श्री वडवाळसिध्दनागेश!! 🚩  श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी   श्रीक्षेत्र वडवाळ 卐श्री तीर्थक्षेत्र वडवाळ卐

ॐ॥श्री नागनाथ दर्शन॥ॐ

 

ज्येष्ठ ◆ कृष्णपक्ष

तिथी ◆ तृतीया

 

वार सोमवार

दिनांक २४ जून २०२४

 

✥●⊱✧⊰● अभंग लहरी – भावार्थासह ●⊱✧⊰●✥

 

गुरुरायाने नवलाई केला, देही अपूर्व बाग दाखविला ।।धृ।। तया बागेचे नवल सांगू काई, साडे तीन चाहूर बागशाई आंत पेरिली पंचरंगी जाई, धन्य कर्त्याची कारागिरी बाई ।।१।। त्या बागेत असे एक विहीर, मोट सत्रावी वाहे निरंतर । मन पवनाचे लावुनिया दोर, सोहं भक्तीचे बळ असे थोर ।।२।। तया बागेत असे एक माळीण, तिला वर असती दोघे जण ।एक भोगी तव एक जाय मरुन, एक जिवंत होतसे फिरुन ।।३।। ऐसे केले सद्‌गुरु रायानं, मज दाखविली अंतरी खूण । काय उतराई होऊ त्यासी जाणं, वारंवार निवृत्ती वंदी चरण ।।४।।

 

✥●⊱✧⊰● ॐ ●⊱✧⊰●✥

 

● भावार्थ :- संत निवृत्ती नाथांनी आध्यात्मिक रुपकाव्दारें अभंगात म्हटले आहे, कीं गुरुने एक नवल केले, व देहात बाग दाखविली. त्या बागेची नवलाई अशी कीं त्या बागेची जागा साडे तीन हात वावराची आहे. त्यात त्याने पंच प्राण प्राण, अपान, व्यान, उदान, समान, अशा पंचरंगाची (पंच प्राणाची) जाई पेरली आहे. अशी त्या आत्माराम निर्गुण माळ्याची कारागिरी होय. त्या बागेत उदर (पोट) रुपी एक विहीर आहे. त्या विहिरीवर नाक रुपी एक मोट लावलेली आहे. त्यातून सत्रावी निरंतर वाहात आहे. ।।१।। त्या मोटेला मन पवन यांचे दोर लावलेले आहेत. ते दोर पाणी ओढीत व सोडीत असतात. हेच सोहं भक्तीचे बळ होय. ।।२।। त्या बागेत सुषुम्ना नाडीला माळीणीची उपमा दिली आहे. व तिच्यावर ज्या दोन नाड्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. इडा पिंगळा सूर्य चंद्र डावी उजवी ह्या नाड्या श्वासोच्छ्‌वासातून एकाच वेळी सारख्या वाहात नाहीत. एकीतून कमी श्वास येतो. व दुसरीतून जोराने जास्त श्वास येतो. दुसरीतून जास्त येतो जेव्हा एक भोगीत जोराने वाहाते, तेव्हा एक मरुन जाते. काही वेळाने जी कमी वाहात असते. ती पुन्हा जिवंत होऊन, परत जोराने वाहात असते. म्हणजेच (श्वासोच्छ्वासाला) हे रुपक त्यांनी दिले आहे. ।।३।। असे सद्‌गुरु रायाने करुन मला अंतरीची खूण पटविली आहे. त्यांचे उपकार मानावें तेवढे थोडेच आहेत. अशावेळी निवृत्तीनाथ वारंवार त्यांचे चरण वंदीत आहेत. ।।४।।

 

✥●⊱✧⊰● ॐ ●⊱✧⊰●✥

 

🙏🙏🙏🙏🙏

 

●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●

संबंधित पोस्ट

प्रभु प्रसाद 🚩महिमा नवनाथांचा…..

vishwatmaklokswamivarta

*तेजस्वी तारा*

vishwatmaklokswamivarta

या विशेष मुहूर्तावर श्रीगणराया आपल्या घरी घेऊन यावे ही विनंती.          *स्थापना मुहूर्त*

जगतज्योती युगपुरुष महामानव क्रांतीसुर्य महान समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…🙏🚩

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta

ओम नमः शिवाय🌹*       *🌹🙏!! शुभ प्रभात !!🙏🌹