vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत पक्षकार, वकीलांनी संमती अर्ज सादर करावेत

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत पक्षकार, वकीलांनी संमती अर्ज सादर करावेत

 

            सांगली प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकआदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकीलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क कमांक आणि ईमेल पत्त्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या sangli-disa.mh@bhc.gov.in या ईमेलवर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के शर्मा यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सांगली जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांपैकी काही प्रलंबित प्रकरणांची यादी जिल्हा न्यायालयाच्या https://sangli.dcourts.gov.in/ या संकेत स्थळावर प्रकाशीत केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 5 प्रकरणांचा समावेश असून ही प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबत जिल्ह्यातील 16 नोटीसा पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आल्या आहेत. तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकीलांना दिली जाईल. पक्षकार प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई येथील: महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यादरम्यान उष्मघाताच्या दुर्घटनेवर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शोक व्यक्त करत घटनेचं राजकारण न करण्याचं केलं आवाहन..

जिल्हा नियोजनच्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावाशाळा, अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी देणार-पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

आज वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 1 मे रोजी मुंबईत