महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र /समाज भूषण संघटनेचा. प्रा. डॉ.जयपाल पाटील यांना पाठिंबा
नागपूर:- (विशेष प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र/ समाज भूषण संघाचा विधान परिषद कोकण पदवीधर संघात निवडणूक लढवीत असलेले अपक्ष उमेदवार डॉ. जयपाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला असून संघाचे अध्यक्ष योगेश वागदे, कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, राज्य सरचिटणीस भूषण बडवे, कोषाध्यक्ष वृषाली वाकचौरे, राज्य संघटक हरिश्चंद्र माने गुरुजी, सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आहे.यामध्ये ते म्हणतात रायगड भूषण डॉ.जयपाल पाटील यांनी सामाजिक जीवनात केलेल्या कार्यामुळे गाव पातळीवरील वंचित समाजाच्या. सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला असून. आपण केलेल्या अप्रतिम, कामगिरी बाबत प्रतिष्ठेचा. सन्मानाचा माध्यमातून आपण उत्तुंग. शिखर गाठले असून आपले ज्ञान कौशल्य व अनुभवाचा उपयोग समाज शहराच्या व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा. सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य बद्दल सन 2019 चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासनाचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री संजय बनसोडे, आमदार किशोर झोडगेवार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. आहे. त्यांनी कोविड- 19 कार्यकाळात केलेल्या विशिष्ट समाज सेवेबद्दल राज्यभरातील अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मानही केला आहे. त्यांचे समाजसेवा राज्य व देशपातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचे योगदान बहुमोल असे आहे. त्यांच्या सारखा अभ्यासू पत्रकार समाजसेवक पदवीधरांचा प्रतिनिधी विधान परिषदेत पोहोचला पाहिजे यासाठी त्यांना संघाने पाठिंबा दिला असून संघटनेचे सर्व सभासदांनी,आपले नातेवाईक मित्रपरिवार, पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी अथवा उद्योग धंद्यानिमित्त राहत असतील त्यांनी आपल्या परिसरातील पदवीधर मतदारांना,अदिवासीसेवक, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, डॉ. जयपाल पाटील यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करावी असे आवाहन अध्यक्ष योगेश बागदे यांनी केले आहे.