vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील कशेळी, काल्हेर खाडी किनाऱ्यावरील अनधिकृत धाब्यांवर कारवाई

कशेळी, काल्हेर खाडी किनाऱ्यावरील अनधिकृत धाब्यांवर कारवाई

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कासित करण्याबाबत दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल, वन विभाग व पोलीस विभागाच्या सहकार्याने कशेळी खाडी किनारी भागात कारवाई करून जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे नष्ट केली.

 

जिल्ह्यातील अनधिकृत हॉटेल, बार, धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभाग, वन विभाग व कांदळवन विभाग यांच्यामार्फत मौजे कशेळी खाडी किनारी असलेल्या चौपाटी ढाबा तसेच मौजे काल्हेर खाडी किनारी असलेल्या MH 10 धाब्यावर जेसीबीच्या साह्याने कारवाई केली.

 

तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या भिवंडी कार्यालयाने केलेल्या कारवाईत कशेळी येथील मोरया ढाबा, खोणी येथील पूजा ढाबा येथे कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विदेशी दारू 2.16 ब लि. आणि देशीदारू 5.4 ब. ली. जप्त करण्यात आली. यासंबंधी नारपोरी व निजामपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भिवंडी तहसिलदार अभिजित खोले यांनी दिली आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी-पुरवणी मागण्यांमध्ये 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी..

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड ऑटो रिक्षासेवा १ जूनपासून सुरू करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याला यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता नागरिकांना दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदेशी, किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांसाठी बंद करावयाच्या वेळेत शिथिलता..

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ