vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी-पुरवणी मागण्यांमध्ये 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी..

लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी-पुरवणी मागण्यांमध्ये 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी..

 

लातूर प्रतिनिधी – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नामुळे लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस मिळणार असून या रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला गती येणार आहे.

   सन 2013 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली. 100 खाटांचे हे रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 31 कोटी 85 लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला होता. परंतु मुख्य अडचण होती जागेची. यासाठी कृषी महाविद्यालयाची 10 एकर जागा निश्चित करण्यात आली. या जागेच्या अधिग्रहणासाठी 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीची गरज होती. यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

  त्यांच्या या पाठपुराव्यास यश येऊन पुरवणी मागण्यांमध्ये लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी 3 कोटी 32 लाख 68 हजार 650 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीचे काम मार्गी लागले आहे.

संबंधित पोस्ट

शाश्वत विकास ध्येये, जिल्हा निर्देशक आराखडा  प्रगतीमापन अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन..

vishwatmaklokswamivarta

देशी गोवंश संवर्धनासाठी जिल्ह्यात पात्र गोशाळांना 24 लाख 93 हजार रूपयांचे परिपोषण अनुदान…

कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य ‘तान्हा पोळा उत्सव’ उत्साहात पार पडला; चि. ओम मुडके प्रथम!

vishwatmaklokswamivarta

रासायनिक खतांमुळे आरोग्याला धोका असल्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी~केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी*

राजा रघुवंशी हत्या प्रकरण- हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली  सोनम रघुवंशी  सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा सी.एम चाही मोठा खुलासा…