vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य ‘तान्हा पोळा उत्सव’ उत्साहात पार पडला; चि. ओम मुडके प्रथम!

कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य ‘तान्हा पोळा उत्सव’ उत्साहात पार पडला; चि. ओम मुडके प्रथम!

राज्य प्रतिनिधी-कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य ‘तान्हा पोळा उत्सव’ उत्साहात पार पडला; चि. ओम मुडके प्रथम! साथ फाउंडेशन, हनुमान मंदिर समिती व एकता शारदा महिला मंडळाचा उपक्रम; २५ नंदीबैलांचा सहभाग, पुढील वर्षी अधिक भव्य आयोजनाचा संकल्प

कोटगल (विशेष प्रतिनिधी):येथील साथ फाउंडेशन, हनुमान मंदिर समिती व एकता शारदा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य तान्हा पोळा उत्सव २०२६’ अत्यंत उत्साही, आल्हाददायक आणि आनंददायी वातावरणात दिमाखात पार पडला. कोटगल गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आणि भव्य स्वरूपात या उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जतन व्हावे व लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने हनुमान मंदिर परिसरात या नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चिमुकल्यांनी जवळपास २५ सुसज्ज व आकर्षक रीतीने सजवलेल्या लाकडी विविध नयनरम्य वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सजला नंदी, नटली बालकंपनी!’ या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता

🏆 उत्कृष्ट नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा – विजेते बालमित्र

🥇 प्रथम क्रमांक: चि. ओम मुडके(पारितोषिक: शाळेची बॅग – सौ. संगीता विजय गद्देवार यांच्यातर्फे)🥈 द्वितीय क्रमांक: कु. सानवी ईनामवार(पारितोषिक: शाळेची किट – श्री. संदीप के. कोहळे, वनरक्षक अधिकारी, गडचिरोली यांच्यातर्फे

तृतीय क्रमांक: कु. लितीशा खोबरे,(पारितोषिक: वॉटर बॉटल – श्री. किरण चंदू भुरसे, माही एंटरप्रायजेस, कोटगल यांच्यातर्फे) विशेष प्रोत्साहन व कौतुक:स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व २५ बालमित्रांना आयोजकांतर्फे नंदीबैलासाठी खास भेटवस्तू (गिफ्ट) देऊन सन्मानित करण्यात आले.

🔮 पुढील वर्षी अधिक भव्य आयोजनाचा संकल्प:बालगोपाळांचा आणि ग्रामस्थांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद पाहून आयोजकांनी “पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या व भव्य दिव्य स्वरूपात नंदीबैल स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल,” असा दृढ संकल्प जाहीर केला.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी साथ फाउंडेशनचे पदाधिकारी, हनुमान मंदिर समितीचे सदस्य, एकता शारदा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि कोटगल येथील सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच माही एंटरप्रायजेस, चेतन ग्राफिक्स, गणेश वेल्डिंग वर्क आणि विजय कृषि व किराणा स्टोअर यांनी मोलाचे सहकार्य केले. गावातील या पहिल्यावहिल्या भव्य आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे व बालकांचे कौतुक होत आहे.

आयोजक व सौजन्य:साथ फाउंडेशन कोटगल, हनुमान मंदिर समिती व एकता शारदा महिला मंडळ, कोटगल (ता. जि. गडचिरोली).

0000

संबंधित पोस्ट

बाबूरावजींनी अनेकांना प्रेरणा दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे अधिक गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• *रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती *मुंबई ३.० साठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा एकात्मिक मास्टर प्लॅन……

vishwatmaklokswamivarta

मुंढवा पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे पाषाण येथे स्थलांतरण

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन

vishwatmaklokswamivarta

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta