vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनैतिक व्यापार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

अनैतिक व्यापार या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

 

ठाणे, प्रतिनिधी) : दि.२८ जून २०२४ रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ठाणे व ARZ संस्था यांच्या सयुक्त विद्यमाने हॉटेल टीप टॉप प्लाझा येथे Consultation to Combat Sex Trafficking from Thane. Maharashtra to Goa या बाबत एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेद्र गायकवाड यांनी ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत देहविक्रिय करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांचे पुनर्वसन करण्याकरिता भिवडी येथे चालविण्यात येणाऱ्या पेपरडिश उत्पादन, सॅनिटरी नॅपकीन प्रोडक्शन व सर्जिकल कॉटन या उ‌द्योगाच्या माध्यमातून या महिलांचे महिला व बाल विकास विभागामार्फत कसे सक्षमीकरण केले जाते या बाबत माहिती दिली. ARZ संस्थेच्या अरुण पांडे यानी गोव्यामध्ये मानवी तस्करी विरोधात कसे काम केले जाते याबाबत सविस्तर विश्लेषण केले. मुक्ती मॉडेलच्या माध्यमातून Sex Trafficking कशी रोखली जाते याबाबत माहिती दिली. गोव्यामध्ये ARZ संस्थेमार्फत केलेल्या २०१४ ते २०२४ या काळातील एकूण बचाव कार्यात महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्ह्यामधील महिला व बालके यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर येत असल्याचे त्यांनी संगितले.

 

ठाणे जिल्ह्याच्या बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती राणी बैसाने व सदस्य श्रीमती मनीषा झेंडे, बाल न्याय मंडळाच्या सदस्य श्रीमती शिल्पा नेलवडकर व श्रीमती स्वाती रणदिवे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, परिवीक्षा अधिकारी संदिप परदेशी त्याबरोबरच ठाणे जिल्ह्यातील सखी केंद्र व २ यांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन यांचे बरोबरच अनैतिक व्यापार या विषयावर काम करणाऱ्या महाराष्ट्र, ठाणे व गोवा येथील २५ संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेस एकूण ८० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा

पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या-फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी उपकरणे खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावेत..

vishwatmaklokswamivarta