vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी उपकरणे खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावेत..

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी उपकरणे खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावेत..

 

रायगड, प्रतिनिधी:- मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना लाभ दिला असून या योजनेंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र 30 दिवसांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, कार्यालयात सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड समाधान इंगळे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे जिल्ह्यात 19 हजार 437 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 8 हजार 300 लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट रु.3 हजार लाभ वितरण केला आहे.००००००

संबंधित पोस्ट

जालन्यात शिवसेना महिला आघाडीचा `माझं कुकूं माझा देश’ आंदोलन

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

हज यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु, हज कमिटी ऑफ इंडियाने मागवले अर्ज; जाणून घ्या तपशील

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 14 एप्रिलला ‘कोरडा दिवस’; मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे हवे असतील तर मला आमदार करणे गरजेचे आहे. मी आमदार झाल्यानंतर राज्याचा कॅबिनेट मंत्री नक्कीच होईल, असा विश्वास महायुतीचे (शिवसेना) उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

vishwatmaklokswamivarta