vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे हवे असतील तर मला आमदार करणे गरजेचे आहे. मी आमदार झाल्यानंतर राज्याचा कॅबिनेट मंत्री नक्कीच होईल, असा विश्वास महायुतीचे (शिवसेना) उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे हवे असतील तर मला आमदार करणे गरजेचे आहे. मी आमदार झाल्यानंतर राज्याचा कॅबिनेट मंत्री नक्कीच होईल, असा विश्वास महायुतीचे (शिवसेना) उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

 

राज्य प्रतिनिधी

आता लवकरच जिल्हा परिषद आणि महानगर पालिका, नगर पालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे हवे असतील तर मला आमदार करणे गरजेचे आहे. मी आमदार झाल्यानंतर राज्याचा कॅबिनेट मंत्री नक्कीच होईल, असा विश्वास महायुतीचे (शिवसेना) उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

यावेळी कुंबेफळ येथील तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद गाडेकर, काँग्रेस कार्यकर्ते कडुबा गाडेकर, जनार्दन गाडेकर, मिलींद गाडेकर यांनी अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

इंदलकरवाडी, वाघ्रुळ, कुंबेफळ (सिंदखेड) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यालयास भेटी दिल्या. यावेळी श्री. अरविंदराव चव्हाण, अण्णासाहेब चित्तेकर, शंकुतलाताई कदम, अनवर मिर्झा बेग, प्रभाकर देवंदे, रिकंल तायड, वंदना खांडेभराड, सतीश वाहुळे, संतोष ढेंगळे, उमेश मोहिते, विजू सोनणे, पद्माकर हंडे, किशोर सवडे, शितला भारुडे, विष्णू घुले, विष्णू भुतेकर, तसेच संतोषराव मोहिते, श्री. कपूर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना श्री. अर्जुनराव खोतकर म्हणाले की, येथील गर्दी पाहून निश्चितच वाटते की, आपला विजय नक्कीच आहे. परंतू आपल्याला गाफील राहुन चालणार नाही, रात्र सुध्दा वैर्‍याची आहे. येणार्‍या वीस ताखरेला विधानसभेची निवडणूक पार पाडणार आहे. याच निवडणूकीसंदर्भात मी तुमच्याकडे आलेलो आहे. आपण सत्तेवर नसतांनाही आपण वाघु्रळच्या देवी मंदिर रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये दिले, मुस्लीम वस्तीत जाणार्‍या रस्त्यासाठी दहा लाख रुपये दिले. त्याचबरोबर गणपती, सावता आणि महादेव मंदिरासाठी सुध्दा पंधरा लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे धनुष्य बाणासमोरील बटण दाबून मला प्रचंड मतांनी विजयी कराल, यात शंका नाही. आपल्याकडे सत्ता नसतांनाही आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊ शकतो तर सत्ता हाती आल्यानंतर तर पाहयचेच काम नाही. गावातील शाळेचे बांधकाम केले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहासाठी दहा लाख रुपये दिले, असे असतांनाही तो आयत्या बिळावरील नागोबा म्हणतो, मी आणले, ते केले, प्रतंत तर काहीच काम केले नसते. असे सांगून ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बीज बिल कजार्;तून मुख्त केले आहे. केंद्राची नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकर्‍यांना सहा हजार रुपये मिळत होते ते मुख्यमंथत्र्यंनी बारा हजार केले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांना त्या खुर्चीवर बसवण्यासाठी मला आमदार करणे गरजेचे आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कुंबेफळ (सिंदखेड) येथे बोलतांना श्री. खोतकर म्हणाले की, कुंभेफळ गावातीलमडळीनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. आपल्या गावातील ओढे- नाले अरुंद होते, त्यावर बंधारे घतले. ते मी स्वत: रुंद करुन दिले. प त्यामुळे आपल्या गावचे पाणलोट क्षेत्र वाढले आहे. गावाला गणपती सभा मंडप दिलेला आहे. पेय जल योजना दिली. त्यामुळे गावातील पाण्याची समस्या सुध्दा सुटली आहे, असेही शेवटी श्री. खोतकर म्हणाले.

संबंधित पोस्ट

शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठयांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे   – सत्यजित बडे ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,राजिप   जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न…

vishwatmaklokswamivarta

दशसूत्री’ची प्रेरणाः वैष्णवीला आधार कृत्रिम पायाचा-दिव्यांग विद्यार्थिनीच्या सक्षमतेसाठी एकवटली शाळा अन गाव…

vishwatmaklokswamivarta

विश्वास नांगरे, अशुतोष कुंभकोणी वळसे पाटलांच्या बंगल्यावर… घडामोडींना वेग!

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी कालावधीत ग्रंथमहोत्सव

vishwatmaklokswamivarta

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

vishwatmaklokswamivarta