vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 14 एप्रिलला ‘कोरडा दिवस’; मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

जिल्ह्यात 14 एप्रिलला ‘कोरडा दिवस’;
मद्यविक्री बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

बुलडाणा, प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी दि. 14 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या, बिअर शॉपी विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मुंबई दारूबंदी कायद्यामधील कलम अन्वये अधिकाराचा वापर करून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या सीएल-3, एफएल-2, सीएलटीओडी-3, एफएलबीआर-2, एफएल-3 आदी सर्व दि. 14 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निर्गमित केले आहेत. अनुज्ञप्तीधारकांनी व संबंधितांनी या आदेशांचे पालन न केल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशाद्वारे देण्यात आला आहे.
000000

संबंधित पोस्ट

कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा-वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची मागणी…

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस पक्षाला खिंडार; शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, दिल्ली गाठण्याचा इशारा

सामाजिक न्याय विभागाच्या योजना गाव-खेड्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले• सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा..

सूचना व अभिप्राय मागवण्याकरिता दिनांक 3 जुलै 2026 रोजी कार्यशाळा

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

कामठी-कोराडी-कन्हान विकासाला नवा आयाम मिळणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta