vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

 

बुलडाणा, प्रतिनिधी: ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान बुलढाणा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण सभा दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, बुलढाणा येथे होणार आहे.

तसेच अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती. नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडती करीता बुलढाणा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व तहसिलदार विठ्ठल कुमरे यांनी कळविले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 15 मे पूर्वी अर्ज सादर करावेत..

पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार! व्हाईस ऑफ मीडियाच्या जिल्हा बैठकीत आमदार संजय गायकवाड यांचा शब्द; जिल्ह्यातील ४०० पेक्षा अधिक पत्रकारांना मिळाले विम्याचे गिफ्ट…

vishwatmaklokswamivarta

जुन्या बँक खात्यात विसरलेले, अडकलेले पैसे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने व्याजासह परत मिळण्याची सुवर्णसंधी

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी केली विविध विकास कामांची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महास्ट्राइड’ मूल्यांकन समितीची बैठक

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग