vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आदिवासी मुलांचे/मुलींचे 13 वसतिगृहामध्ये ऑनलाईन      प्रणालीव्दारे शासकीय वसतिगृह प्रवेश सुरु

आदिवासी मुलांचे/मुलींचे 13 वसतिगृहामध्ये ऑनलाईन      प्रणालीव्दारे शासकीय वसतिगृह प्रवेश सुरु

 

 

 

  रायगड, (जिमाका);-आदिवासी विकास विभागाकडुन अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता इ.8वी पासुन पुढील शिक्षणाकरिता रायगड मध्ये पेण (मुले), कर्जत (मुले), नेरळ (मुले), पनवेल खांदा कॅालनी (मुले), पनवेल नविन (मुले), महाड (मुले), सुधागड (मुले), नागोठणे (मुले), पेण (मुली), पनवेल (मुली), नेरळ (मुली), सुधागड (मुली) व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी (मुले) असे एकुण 13 वसतिगृहे कार्यान्वयित आहे.

 

वसतिगृहामध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता प्रवेश अर्ज https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर स्विकारण्यात येत आहेत. अर्ज भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर आवश्यक सुचना या सदर वेबसाईटवर दिलेल्या आहेत. “सदर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व निर्वाह भत्ता सोय व इतर शैक्षणिक सोयी सुविधा आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.”

 

वसतिगृह प्रवेशासंदर्भात कोणत्याही अडचणीकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड येथील वसतिगृह विभागाशी संपर्क साधावा (श्री.दौंड 9075533999) असे आवाहन शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

मुलांना आळशी बनवू नका, मुलांना प्रयत्नशील बनवा- प्रा.डॉ. गणेशजी अग्निहोत्री श्री एम.एस. जैन इंग्लिश स्कूल मध्ये “भारत कल, आज और कल” वार्षिक स्नेहसंम्मेलन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात*

जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द· महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल…

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर..!हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 3 पथके