vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सातारा शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात*

*सातारा शहरात एक धाव सुरक्षेची मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात*

 

सातारा प्रतिनिधी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा व मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित एक धाव सुरक्षेची या उपक्रमांतर्गत सातारा येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली.

 

या स्पर्धेला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी युवकांना मार्गदर्शक सूचना करून फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली.

 

विविध आपत्ती संदर्भात युवक व युवतींमध्ये जनजागृती व्हावी आणि त्यांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये यशवंतराव स्कूल ऑफ सोशल सायन्स, जकातवाडी येथील विद्यार्थी तसेच छत्रपती शिवाजी कॉलेज मधील एनसीसी चे विद्यार्थी, सातारा शहरातील होमगार्ड आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स या संस्थेचे युवक व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी, मॉर्निंग ग्रुप, विरंगुळा ग्रुप जिल्हा परिषद ग्राउंड यांनी सहभाग घेतला

 

यांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.

 

यावेळी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल सायन्सचे प्रा.जीवन बोराटे, छत्रपती शिवाजी कॉलेजचे एनसीसी विभागाचे कॅप्टन श्री. पवार, सातारा होमगार्ड विभागाचे केंद्रनायक तुषार वरांडे आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पवार उपस्थित होते. यावेळी प्रथम तीन विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविणेत आले.

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर*  यांच्या ५७व्या पुण्यतिथी दिनी꧁ *विनम्र अभिवादन* ꧂

vishwatmaklokswamivarta

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

लातूर येथील विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे-. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….