vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

        सांगली प्रतिनिधी

जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली चे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी केले आहे.

  महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी केला आहे. पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि. 11 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

जर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर 25 वि‌द्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमणे 10 हजार वि‌द्यार्थ्यांसाठी 400 प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) असे 200 प्रशिक्षण वर्ग सुरु करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन MA In जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांचे ‌द्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1,A2,B1,B2,C1,C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून शिक्षकांची नावनोंदणी करण्यासाठी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने व्यापक लोकहितास्तव सांगली जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक अधिकाधिक शिक्षकांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 या लिंक वर आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहनही डॉ. होसकोटी यांनी केले आहे.00

संबंधित पोस्ट

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर  जिल्ह्यात एक अतिशय थरारक घटना,येथे बलात्कार  आणि अपहरणाचा आरोप असलेल्या तसेच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीला गोळ्या घालण्यात

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी शासनाचामे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करारवर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणुक औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ…वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक, 15 हजार रोजगार उपलब्ध होणार-:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अवैध वाळू उत्खननाविरोधात तहसील प्रशासन व ग्रामीण पोलिसांची संयुक्त धडक कारवाई २७ लाखांचा मुद्देमाल नष्ट ..

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.