vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माटुंगाच्या (पूर्व) अनियमित बांधकामाबाबत विकासक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – 

माटुंगाच्या (पूर्व) अनियमित बांधकामाबाबत विकासक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार –

 

मुंबई, प्रतिनिधी माटुंगा (पूर्व) येथील मे.प्रेम डेव्हलपर्स या विकासकांनी प्रेमगिरीच्या नामक नवीन इमारतीच्या विकासाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीचा प्रस्ताव आराखड्यासह सादर केला होता. त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु, त्यानंतर या इमारतीमध्ये अनियमित बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून विकासक आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

 

सदस्य सुभाष धोटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आहे. या इमारतीचा चौथा मजला हा वाहनतळासाठी आरक्षित असून चारचाकी वाहनांकरिता असलेल्या उद्धवाहनावरती सेवा मजला हा उद्धवाहनाच्या यंत्रसामग्रीसाठी वापरण्यात येत आहे. या इमारतीमध्ये इतरत्र ठिकाणी अंदाजे १ मीटर ते १.५ मीटर उंचीचे बीमा गर्डर आढळून आले.

 

तसेच इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर १.५ मीटर उंचीचा सेवा मजला आढळून आला नाही. त्यानुसार इमारतीच्या ४ थ्या मजल्यावरील वाहनतळाची उंची ही मुख्य इमारतीच्या भागात २.५ मीटर इतक्या पूर्व मान्य उंची इतकी न करता त्याऐवजी या वाहन मजल्याची उंची ४.० मीटर इतकी अनियमितपणे विकासकाद्वारे करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

 

या इमारतीच्या बांधकामाची वस्तुनिष्ठ तपासणी न करता संबंधित विकासकास भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभालआणि परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

मोफत कायदेशीर मदतीसाठी ‘15100’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

न्यायालयातील हिरकणी कक्षाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासन विभागाकडीलभरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्रामअन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

सायन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यभरातील  ITI मध्ये 1 लाख विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग