vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कोणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही; तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !कोणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही; तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 

राज्य प्रतिनिधी

       पंढरपूर (सोलापूर) – विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून अन्याय्य कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन केली. या वेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार श्री. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. केवळ विशाळगडच नव्हे, तर राज्यभरातील ज्या ज्या गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे झाली आहेत, सर्व हटवण्यात येतील, तसेच सर्व गड-दुर्गांचे शासनाकडून संवर्धन अन् विकास करून त्यांचे पावित्र्य राखले जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला; मात्र आंदोलन करणार्‍या गड-दुर्ग प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावणे, तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करणे, अत्यंत चुकीचे असून या प्रकरणी सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच सध्या अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहिम विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करावी, तसेच राज्यातील ज्या ज्या गडांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती सर्व अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवावीत, अशा मागण्याही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याची माहिती . सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती,

संबंधित पोस्ट

२७  टक्के उमेदवारी ही इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) देण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. तशी घोषणा… देवेंद्र फडणवीस भाजपा विरोधी पक्षनेता

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील विविध भागा सह मुंबईत दमदार पावसाची हजेरी, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

vishwatmaklokswamivarta

मंदिरे बंद – हिंदू सणांवर निर्बंध : भाजपा आमदार चव्हाण यांचे सरकारवर टीकास्त्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना-मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा

vishwatmaklokswamivarta