vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यू.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला जिल्हास्तर विजेता संघ..

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यू.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला जिल्हास्तर विजेता संघ..

 

 

रायगड जिमाका :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेचे आयोजन 15 वर्षाखालील मुले 17 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुली या वयोगटात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील (पनवेल मनपा वगळून) 32 संघांनी सहभाग घेतला साधारण 500 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.

 

या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे-15 वर्षाखालील मुले, प्रथम- हिरानंदानी ट्रस्ट स्कूल भोकरपाडा, द्वितीय- युएस चे इंग्लिश मीडियम स्कूल उरण, तृतीय- रेड क्लिप स्कूल उलवे

 

17 वर्षाखालील मुली- प्रथम- शिशु मंदिर खोपोली, द्वितीय- एम एन आर इंटरनॅशनल स्कूल पळस्पे, तृतीय- आर के एफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा

 

17 वर्षाखालील मुले-प्रथम-यू ई एस इंग्लिश मिडीयम स्कूल, उरण, द्वितीय-जनता विद्यालय खोपोली, तृतीय-सेंट वेल्फ्रेड हाईस्कूल शेडुंग

 

या स्पर्धेत जोसेफ नदार, अहमद दादरकर, युवराज वाळवी, नमन कोळी, पल्लवी पाटील, मानसी पाटील, श्रावणी देशमुख, रिया गायकर, वेदांश कोळी, विपुल बर्गे, फरहान व समा या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

 

या स्पर्धेसाठी पंच म्हणून पंच साहिल कांबळे, नितेश जगताप, रितेश ठाकूर, प्रथमेश पाटील, देव साटोदे, विराज देशमुख यांनी रायगड जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश साखरकर, धर्मेंद्र साटोदे, यतीराज पाटील, राकेश म्हात्रे, श्रीमती धनश्री गौडा आदींनी सहकार्य केले.

 

रायगड जिल्ह्यातील विजेते संघ आता नेरूळ, नवी मुंबई येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विभागीय स्पर्धेसाठी या संघांना अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे जिल्हा क्रीडा अधिकारी, राजेंद्र अतनुर, श्रीम अंकिता मयेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

 

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी तथा आयुक्त व प्रशासक मा. आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहर महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या नावे विज्ञान व नाविन्यता उपक्रम केंद्र सुरू करणार मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याकरीता रायगड जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन..

शिल्पबाजारात हस्तशिल्पाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल

vishwatmaklokswamivarta

फॅन्ट्सी किड्स स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta