vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महसूल पंधरवड्याचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ पंधरवड्यात नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्यावा

महसूल पंधरवड्याचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

पंधरवड्यात नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्यावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

 

सातारा,  (जिमाका) : महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट कालाधीत जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पंधरवड्यात विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती करुन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते.

 

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. शासनाच्या महत्वकांक्षी योजना गतीने राबवयाच्या असतील तर त्याची जबाबदारी महसूल विभागाकडे दिली जाते, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांच्या अंमलबाजवणीसाठी महसूल विभाग समन्वय म्हणून काम करीत आहे. महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामांमुळे शासनाबरोबरच नागरिकांचाही महसूल विभागावर विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला पुढेही सार्थ ठरवूया.

महसूल विभागाचे काम गतीने व्हावे यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करुन कामात पारदर्शकता वाढवावी. नागरिकांची कामे गतीने करावी, असे सांगून महसूल दिनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

महसूल पंधरवड्यात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्यावा. सातारा जिल्हा शासनाच्या विविध योजना राबविण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. हा पंधरवडा राबविण्यातही अग्रेसर राहील, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने व कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी महसूल पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी मानले.

कार्यक्रमास प्रांताधिकारी, तहसीलदार व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

सैनिक संकुलात शौर्य दिन साजरा

रेखा बैजल यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार50 हजाराचा धनादेश आणि शाल-श्रीफळ देवून सन्मान..

ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या आईवडिलांना सॅल्युट.. ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ऋण

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिलह्यातील विकास कामांचा आढावा कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या केल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta