vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सैनिक संकुलात शौर्य दिन साजरा

सैनिक संकुलात शौर्य दिन साजरा

 

 

 

सांगली, प्रतिनिधी

: शौर्य दिनाचे औचित्य साधून पुष्पराज चौक सांगली येथील सैनिक संकुल आवारात शौर्य दिन समारोहाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल भीमसेन चवदार (निवृत्त), जिल्हा सैनिक मंडळाचे उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालावडकर (निवृत्त), कर्नल वसंत शिंदे (निवृत्त), शौर्य चक्र, मेजर प्रकाश पाटील (निवृत्त), प्राचार्य कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभेदार चंद्रकांत फाटक (निवृत्त), सुभेदार पांडूरंग भोसले (निवृत्त), वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या पत्नी, अवलंबीत, वसतीगृहातील विद्यार्थी, विद्यार्थींनी व त्यांचे पालक उपस्थित होते.

 

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्वखर्चातून मुलांच्या वसतिगृहात बसविण्यात आलेल्या पेविंग ब्लॉक चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शोर्य दिनास उपस्थित सर्व शौर्य पदक विजेते, वीर पत्नी, वीर माता-पिता यांना भेट वस्तू देवून आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

 

प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले. आभार सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी मानले. सूत्रसंचालन कल्याण संघटक अजयकुमार चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 

00000

संबंधित पोस्ट

चेंबूरला अनुसूचित जाती, नवबौद्ध, मुला – मुलींसाठी आयटीआय

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

स्त्री भृण हत्या थांबविण्याची जबाबदारी प्रत्येक नवी मुंबईकराची

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे*जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश-परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

विविध कृषी पुरस्कार सन-2023 करिताशेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत..