vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सामाजिक न्यायाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,१०,१८६ अर्ज मंजूर

सामाजिक न्यायाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,१०,१८६ अर्ज मंजूर

 

  मुंबई, प्रतिनिधी:- राज्य शासनाने राज्यातील महिला, युवक-युवती,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्यायाच्या विविध योजना सुरु केल्या असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर जिल्ह्यात या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्यात येत असून या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाने जाहिर केलेल्या सर्व माध्यमांवर व जाहिरातींमधून या योजनांचे निकष व लाभ याबाबत माहिती घेण्याचे आवाहनही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,८४,८४३ अर्ज प्राप्त, मंजूर अर्ज – ३,१०,१८६, फेरतपासणीसाठी पाठविलेले अर्ज – ७१,४५९, नामंजूर अर्ज – ११५० आहेत.

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नवीन नोंदणी झालेल्या आस्थापना शासकीय – ३६, खाजगी – २८, आतापर्यंत अधिसूचित झालेली रिक्त पदे २७४१, शासकीय – ४०५, खाजगी – २३३६, ऑनलाईन अर्ज केलेले उमेदवार २६३८, अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची संख्या- शासकीय – ११, खाजगी – ३००, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेत अर्ज वाटप – १०००. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज वाटप – १५००, प्राप्त अर्ज – १६३, वैध अर्ज – ९९, इतर जिल्हयातील – ६४ असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 

—–000—–

संबंधित पोस्ट

महाविद्यालय स्तरावरील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : भाजपा विरोधी पक्षनेता  देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त  कवठेमहांकाळमध्ये युनिटी पदयात्रा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचा दर जाहीर न झाल्यामुळे   शेतकरी संघटनांनी ऊस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय केल्याने वाहतूक ठप्प…

vishwatmaklokswamivarta