vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

महाराष्ट्रातील सहा अग्निशमन जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’तर पाच कर्मचाऱ्यांना ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान

 

            नवी दिल्ली प्रतिनिधी: 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 11 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 उल्लेखनीय सेवांसाठी ‘राष्ट्रपती पदक’ तसेच ‘शौर्य पदक’ आणि ‘उत्कृष्ट सेवा पदक’ दरवर्षी अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना जाहीर केली जातात. वर्ष 2024 साठी 59 जवानांना ‘अग्निशमन सेवा पदक’ प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

 

शौर्य आणि पराक्रम गाजवल्याबद्दल संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना ‘विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतीं पदक” तर पाच जवानांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक” प्रदान करण्यात आला.

 

देशभरातील उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’, 4 कर्मचाऱ्यांना, उल्लेखनीय सेवेसाठी ‘अग्निशमन सेवा पदक’ आणि 55 कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा कामगिरीसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्रातील 6 अग्निशमन जवानांचा समावेश आहे.

 

देशातील 14 कर्मचाऱ्यांना नागरी संरक्षण पदकांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट सेवेसाठी ‘‘नागरी संरक्षण पदक’ तसेच उल्लेखनीय सेवेसाठी ‘ ‘नागरी संरक्षण पदक’ अनुक्रमे 3 कर्मचारी / स्वयंसेवक आणि 11 कर्मचारी, स्वयंसेवकांना पदक प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘नागरी संरक्षण पदक’ प्रदान झाली.

 

राज्यातील ‘अग्निशमन सेवा पदके’ आणि ‘नागरी संरक्षण पदक’ प्राप्त अधिका-यांची नावे-

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अग्निसेवा पदक – संतोष श्रीधर वॉरिक, मुख्य अग्निशमन अधिकारी यांना प्रदान करण्यात आला.

 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- अग्निसेवा पदक

 

किशोर ज्ञानदेव घाडीगावकर, विभागीय अग्निशमन अधिकारी, अनंत भिवाजी धोत्रे, उप अधिकारी, मोहन वासुदेव तोस्कर, आघाडीचे फायरमन, मुकेश केशव काटे, लीडिंग फायरमन आणि किरण रजनीकांत हत्याल, अग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे.

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम)- नागरी संरक्षण पदक अशोक बोवाजी ओलंबा, हवालदार यांना प्रदान करण्यात आले आहे.

 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम)- )- नागरी संरक्षण पदक

 

नितीन भालचंद्र वयचल, प्राचार्य, शिवाजी पांडुरंग जाधव, जेलर ग्रुप-1, दीपक सूर्याजी सावंत, सुभेदार आणि जनार्दन गोविंद वाघ, हवालदार यांचा समावेश आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

.मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासन जिंदाबाद ! जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

रायगड मधून बातमी- रायगडमधील तरुणाची देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट, गुन्हा दाखल

राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना…

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा… सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगावॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईमध्ये 26 जानेवारीपर्यंत सुरु होणार 100 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केंद्रे; गरिबांना मिळणार स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा…

vishwatmaklokswamivarta