माहीम पूर्व एस एल रहेजा हॉस्पिटल समोरील फुटपाथ वर घाणेरड्या कपड्यांचे प्रदर्शन-श्री गाडेकर बंधू वृत्तपत्र लेखक
मुंबई प्रतिनिधी
माहीम पूर्व मुंबई 16 या ठिकाणी सुसज्य रस्ता प्रसिद्ध एस एल रहेजा हॉस्पिटल गेट नंबर तीन समोरील फुटपाथवर बाजूच्या वस्तीतील लोकांनी स्टील संरक्षक जाळींवर जुनीपुराणी धुतलेल्या कपड्यांचे नियमित वाळवणी करतात वाळवणी करता चा वापर करतात त्यामुळे या रुग्णालयाकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या घाणेरडे कपड्यांचं प्रदर्शन पाहायला मिळते एवढे भव्य दिव्य सुसज्य रुग्णालय पण त्या समोरील फुटपाथ वरील स्टील जाळीवर वाळवत घातलेले कपडे पाहून मनाला दुःख होते एका बाजूला रस्ता स्वच्छ सुंदर तसेच नामांकित एस एल रहेजा हॉस्पिटल हे विदारक चित्र पाहता सुंदर परिसराला लागलेली कीड असे म्हणावे लागेल कृपया महानगरपालिका जी उत्तर हॉस्पिटल व्यवस्थापक स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष विदावे विनंती किंवा हॉस्पिटल समोरील स्टील संरक्षण जाळीची उंची नऊ फुटाच्या दरम्यान वाढवून त्यावर तार्याची कुंपण घालावे हे दुखणे कायमची बंद होईल सुंदर लागलेली कीड नष्ट होईल..श्री गाडेकर बंधू वृत्तपत्र लेखक