
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच दुःख नौदलाचे अधिकारी पाहणी पथक रवाना..
राज्य प्रतिनिधी
भारतीय नौदलाने हा पुतळा उभारला होता. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे आणि त्वरित. पाहणी करता नौदलाचे पथक रवाना झाले आहे लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे. भारतीय नौदलाने आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.
नौदल दिनी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील. पथक रवाना झाले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या सर्वच स्तरातून सरकारवर टीका होत आहे. राजकारण्यांसह कलाकर, आणि जनतेतून सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी पुतळा तयार करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. खरतर भारतीय पुतळा उभारला होता. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील. पथक रवाना झाले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे.
अनावरणानंतर अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत करावाईलाही सुरूवात केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात आत्तापर्यंत दोन व्यक्तींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे.



