vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील  म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली घटनेत दुर्दैवाने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी..

मुंबईतील चर्नी रोड पूर्व येथील  म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली घटनेत दुर्दैवाने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील चर्नी रोड पूर्व  विभागातील म्हाडाच्या इमारतीची कंपाउंड भिंत कोसळली. ही घटना काल ची दुपारच्या दरम्यान घडली घटनेत दुर्दैवाने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.या घटनेची नोंद बीएमसी अधिकाऱ्यांनी घेतली आहे

 

याबाबतची माहिती अशी की ,खासजी कंत्राटदाराने गल्ली साफ करण्यासाठी तीन मजूर ठेवले होते. गल्ल्या साफ करत असताना अचानक एक कंपाऊंड भिंत दोघांच्या अंगावर कोसळली. त्यात ते ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनांना देण्यात आली. बचाव कार्य सुरु झाल्यानंतर दोघांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.

 

बीएससीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या फणसवाडीतील दादीशेठ अग्यारी लेनवरील गांधी इमारतीपासून सुमारे ५-७ फूट उंच आणि ३० फूट लांबीची कंपाउंड भिंत कोसळली. ही घटना दुपारी २,३० च्या आसपास घडली. घटनेनंतर परिसरात गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेपूर्वी तीन मजूर गल्ली साफ करत होते. निषाद (३०) , रामचंद्र सहानी (३०) अशी मृतांची नावे आहेत. सनी कनोजिया १९ यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

वर्षागणिक वाढत्या हिरवाईचा उपहार संत निरंकारी मिशनचे वननेस वन अभियान निसर्ग कॉलनी परिसरात होणार वृक्षारोपण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

बॉम्बे ट्रस्टच्या जुमा मशीद कडून लाऊड स्पीकर बंदी वर तोडगा; अ‍ॅप द्वारा आता लाइव्ह अजान, नमाज पाहता येणार..

मुंबईतील भांडूप येथून एका मुलीचे अपहरण करून तस्करी करणाऱ्या 4 महिलांना पोलिसांनी अटक 

जातीभेद, विषमता, अंधश्रद्धा दूर करुन शिक्षण, आरोग्य, सन्मान आणि स्वाभिमानाच्या मार्गावर समाजाला घेऊन जाणे हीच महामानवाला दिलेली खरी मानवंदना – अजित पवार* उपमुख्यमंत्री

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta