vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये

 

 

 

जालना, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पोर्टल वर जालना जिल्ह्यात मोठ्या संख्येने अर्जाची नोंदणी होत आहे. परंतु अर्जांची छानणी करतांना असे निदर्शनास येत आहे की, काही मोजक्याच लोकांकडून आधार कार्डवर जन्म तारीख बदलणे, शाळा सोडल्याचा दाखल्यामधील जन्म तारीखेत खाडाखोड करणे, रेशन कार्ड वर स्वत:च्या हाताने नाव टाकणे, इत्यादी बाबी निदर्शनास येत आहेत.तरी अशा विविध प्रकारे प्रशासनाची दिशाभूल करु नये. तसेच काही खाजगी कम्प्युटर सेंटर, कॅफे सेंटर, आपले सेवा सरकार केंद्र, सेतु सुविधा केंद्रावरुन अशा प्रकारे प्रशासनाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.

 

नारी शक्ती दुत ॲपवरील ज्यांचे फॉर्म डिसअप्रुड झालेले आहेत त्यांनी ते फॉर्म त्रुटीची पुर्तता करुन नारी शक्ती दुत ॲपवर पुन्हा दाखल करावेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोर्टलवरुन प्रोव्हीझनली डिसअप्रुड झालेले अर्ज सुध्दा त्रुटीची पुर्तता करुन दाखल करावेत. जेणेकरुन त्यांच्या अर्जाची पडताळणी करुन पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देणे सोईचे होईल व कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही. असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांच्या तक्रारीचात्वरीत निपटारा करावा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

कनिष्ठ सहाय्यक पदोन्नती प्रक्रिया २६ जिल्हा परिषदांमध्ये पूर्ण- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

कोतवाल पदभरतीसाठी प्रशासन सज्ज 6 जुलै रोजी दु. 3.30 ते 5.00 या वेळात परिक्षा कडक बंदोबस्तात घेण्यात येणार परिक्षा गैरप्रकार टाळण्यासाठी होणार वेबकास्टींग प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रावर आणण्यापस मनाई गैरप्रकार आढळल्यास दोषीविरुध्द होणार कडक कारवाई