vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस

१ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस…

 

राज्य प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नोंदीनुसार, दि. १ जून ते ४ सप्टेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्रातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०२५.४ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली या एकमेव जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत ३१% कमी पाऊस झाला आहे.२५ जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये ७९% आणि ७२% इतका जास्त पाऊस झाला असून, हे दोन जिल्हे सामान्य सरासरी पर्जन्यमानापेक्षा सर्वात जास्त विचलन असलेले जिल्हे आहेत.

 

इतर २३ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २०% ते ५९% जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये ५९% जास्त अतिवृष्टीसह लातूर जिल्ह्याचा समावेश आहे, ५५% जास्त अतिवृष्टीसह पुणे जिल्ह्याचा समावेश आहे, ५०% जास्त अतिवृष्टीसह जळगाव, ४८% जास्त अतिवृष्टीसह नाशिक आणि बीड, ४७% जास्त अतिवृष्टीसह धुळे, ४६% जास्त अतिवृष्टीसह कोल्हापूर, ४५% जास्त अतिवृष्टीसह परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सामान्य पाऊस झाला आहे

संबंधित पोस्ट

एक लाख मराठा उ‌द्योजक संकल्पपूर्तीनिमित्त जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील”कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू मोहीम आज 1 मे पासून

आज १४२ व्या जयंती निमित्ताने जालना शहर महापालिका तर्फे विनम्र अभिवादन.

विशेष लेखः-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना

महाराष्ट्र SSC (१०वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी १ वाजता. निकाल पाहण्यासाठी भेट द्या: sscresult.mahahsscboard.in digilocker.gov.in

विधान परिषद लक्षवेधी निवासी आदिवासी आश्रमशाळेची वेळ,विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊनच- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत