vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत

दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत

 

मुंबई, प्रतिनिधी: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची तयारी’ या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

राज्यात गणेशोत्सव उत्साहात सुरु असून मुंबईतील गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत देश-विदेशातून लाखो भाविक गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर राज्यशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सव आनंदात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येते. मंगळवार 17 सप्टेंबर, 2024 रोजी अनंत चतुर्दशी दिनी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली तयारी यासंदर्भातील माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. सपकाळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार, दि. 13 आणि शनिवार दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

—000–

संबंधित पोस्ट

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने 19 डिसेंबर रोजी“पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कांदिवली येथे राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव…

vishwatmaklokswamivarta

कंगणाला आवरा, नाहीतर जनआंदोलन होईल……

vishwatmaklokswamivarta

अकोट येथे महिला शिक्षिकांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

पोलीस हवालदार समद खान पठाण सेवानिवृत्त-समाजसेवक मुसा खान यांनी सेवानिवृत्त बद्दल पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला