vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सांगली जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त16 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम

सांगली जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त16 सप्टेंबरची सार्वजनिक सुट्टी कायम

 

 

 

      राज्य प्रतिनिधी  सांगली, : सांगली जिल्ह्यात यापूर्वी अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ईद-ए-मिलाद निमित्त सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

 

उप सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दि. 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेवून सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे नमूद आहे.

 

पोलीस अधीक्षक सांगली यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या अहवालामध्ये ईद-ए-मिलाद निमित्त दि. 16 सप्टेंबर रोजी 11 मिरवणुका, दि. 18 सप्टेंबर रोजी एक मिरवणूक व दि. 19 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात एकूण 8 मुख्य मिरवणुका आहेत. शासन अधिसूचनेमध्ये 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत नमूद नाही. ही वस्तुस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. 16 सप्टेंबर 2024 रोजीची जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

 

00000

संबंधित पोस्ट

मतदान करणारच… इतरांनाही सांगणार; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती*

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार समिती बंधनकारक

vishwatmaklokswamivarta

शिवसेना  पक्ष नाव व धनुष्यबाण  ही निशाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल करण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे  गटाने सर्वोच्च न्यायालयात  याचिका दाखल  याचिकेवर आज  दुपारी 3.30 वाजता सुनावणी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024-सार्वजनिक मालमत्‍ता विद्रुपीकरणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत नाशिकला होणार विश्व मराठी संमेलन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये तैलचित्राचं अनावरण;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अनेक मान्यवर उपस्थित मात्र राज ठाकरेंची एकच चर्चा…

vishwatmaklokswamivarta