vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणान्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे या उद्देशाने यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी -शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत www.mahamesh.org या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई- सुविधेसह २० मेंढ्या तसेच मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातीच्या नर मेंढाचे ७५% अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान दिले जाईल, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान इ. घटकांचा समावेश केला आहे.

 

मेंढयासाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ नर मेंढा एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/- असे एकूण २४,०००/- चराई अनुदान वाटप केले जाईल.

 

मेंढी -शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्थ बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी आडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी ‌द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान दिले जाईल.

 

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी कमाल रु. ९०००/- मर्यादेत ७५% अनुदान याबाबींचा समावेश आहे.

 

सदर योजनेचे मार्गदर्शक सूचना अटी शर्ती, अर्ज योजेनेचे वेळापत्रक इ. www.mahamesh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या योजेने संबंधी अधिक माहिती साठी नजीकच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा.

 

सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज क) या प्रवर्गातीलच इच्छु

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे जिल्ह्यात दाखल* *20 जुलैपासून नागरिकांसाठी प्रदर्शन खुले**वाघनखे सातारा जिल्ह्यात सात महिने असणार**जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

कुचीत विकसित कृषि संकल्प अभियान उत्साहात संपन्न

बीड जिल्ह्याचे सरपंच: संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल…

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे भाव..

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत जमीन विक्री प्रस्ताव आमंत्रितअनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी संधी:

समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल संस्थेच्यावतीने दिव्यांग आणि गरजू युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta