
’स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत 3 हजाराहून अधिक नागरिकांच्या सहभागातून सर्व 22 विसर्जन स्थळी स्वच्छता मोहीमा
नवी मुंबई प्रतिनिधी‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आला असून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छताविषयक नानाविध उपक्रम राबविण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आलेले आहे.
त्यास अनुसरून अनंतचतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणा-या आज पहाटेपर्यंत सुरू असलेल्या श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांचा परिसर स्वच्छतेची विशेष मोहीम आज सर्व ठिकाणी संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहयोगाने राबविण्यात आली.
यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व स्वच्छतामित्रांसोबतच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, एनएसएस व इतर विद्यार्थी तसेच स्वच्छताप्रेमी नागरिक उत्साहाने सहभागी होत आपापल्या क्षेत्रातील विसर्जन स्थळांची एकजुटीने साफसफाई केली. यामध्ये 22 विसर्जन स्थळांवर 3 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत विसर्जन स्थळांचा परिसर स्वच्छ केला.
‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानाचा शुभारंभ आज वाशी सेक्टर 6 येथील जागृतेश्वर तलाव परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबवून महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. विशेष म्हणजे याठिकाणी ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक श्री.नवनाथ वाठ यांनी आवर्जुन उपस्थित राहून स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत स्वच्छ महाराष्ट्र मिशनचे उपआयुक्त श्री.मल्लिकार्जुन पाटील देखील उपस्थित होते. माजी आमदार श्री.संदीप नाईक यांनीही या मोहीमेत सहभाग घेतला.
वाशी येथे जागृतेश्वर तलाव परिसरासारख्या विसर्जन ठिकाणाप्रमाणेच आठही विभागातील 22 मुख्य विसर्जन स्थळांवर तेथील विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. यामध्ये बेलापूर विभागातील 5, नेरूळ विभागातील 2, वाशी विभागातील 2, तुर्भे विभागातील 3, कोपरखैरणे विभागातील 2, घणसोली विभागातील 4, ऐरोली विभागातील 3 व दिघा विभागातील 1 अशा 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर या सखोल स्वच्छता मोहीमा व्यापक लोकसहभागातून राबविण्यात आल्या.
श्रीमूर्ती विसर्जनला येताना मोठ्या प्रमाणात फुलांच्या पाकळ्यांची उधळण होते. त्यामुळे विसर्जन स्थळांवर व जलाशयात मोठ्या प्रमाणात फुलांचे निर्माल्य पडलेले आढळते. या सखोल स्वच्छता मोहीमेत प्राधान्याने हाच कचरा संकलित करण्यात आला व त्याची वाहतुक करण्यात आली.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये दररोज विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आजच्या विसर्जन स्थळांच्या स्वच्छता मोहीमांप्रमाणेच नागरिकांनी 2 ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात येणा-या सर्वच उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत



