
कृषी विज्ञान या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित उपक्रम;बुलढाणा कृषी विज्ञान केंद्र येथे कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे थाटात उद्घाटन
राज्य प्रतिनिधी बुलडाणा,(जिमाका), कृषी विज्ञान केंद्र,बुलढाणा येथे देशातील कृषीविज्ञान केंद्रांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य आयोजित कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे (२३ ते २८सप्टेंबर,२०२४) थाटात उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत आज पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार संजयभाऊ गायकवाड, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, संचालक मनोजकुमार ढगे, जिल्हा संसाधन रवी जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख,कृषी केंद्र अनिल तारू आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अनिल तारू यांनी कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाच्या आयोजनामागील भूमिका आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात व्यक्त केली व कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सखोल माहिती उपस्थितांना सांगितली. आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात अन्न प्रक्रिया उद्योगाने समृद्ध अशा फूड पार्कचे महत्त्व विषद केले व शेतकऱ्यांसाठी त्याची उपयुक्तता याविषयी आपले सविस्तर मत मांडले. ते यापुढे म्हणाले की, शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्याचे सहज व सुकरपणे जगणे अत्यंत महत्वाचे आहे. कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाच्या तांत्रिक सत्रात कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे कृषी शास्त्रज्ञ डॉ.नरेंद्रकुमार देशमुख, डॉ.सुकेष्णी वाणे,डॉ.जगदीश वाडकर,डॉ. भारती तिजारे व कृतिका गांगडे यांनी उपस्थितांना आधुनिक शेती,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय,तृणधान्य व त्याचे आहारातील महत्व,कृषी अभियांत्रिकेचे शेतीतील महत्व व गरज ई. विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.जगदीश वाडकर, विषय विशेषज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले. तसेच शिवाजी पिसे, नितीन काटे, अनिल जाधव, कोकिळा भोपळे, अनुराधा जाधव, रणजीत सदार, नंदकिशोर ढोरे व नयनसिंह चव्हाण कृषी विज्ञान,केंद्र,बुलढाणा आदींनीकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेतकरी,कृषी पदवीचे विद्यार्थी,कृषी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
—



