vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रक्त केंद्रासाठी ना-हरकत प्रमाणपत्र; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे स्पष्टीकरण

मुंबई : औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा अधिनियम १९४५ मधील नियम अन्वये अशासकिय संस्था किंवा धर्मदाय संस्थेस रक्तकेंद्र स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य रक्त संक्रमण परिषदेस आहेत. त्यानुसारच ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहे.

अशासकिय संस्था किंवा धर्मदाय संस्था यांच्यामार्फत विहित नमुन्यामध्ये अर्ज, त्यासोबत आवश्यक कागदपत्र सादर करण्यात येतात. या अर्जासोबत प्रक्रिया शुल्क १० हजार रूपये भरावे लागते.  अशा संस्थांचे अर्ज, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत प्रस्तावांची सखोल छाननी राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व नियामक मंडळाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येते व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेण्यात येते.

संस्थेचे परिपूर्ण प्रस्ताव  संचालक, आरोग्य सेवा तथा अध्यक्ष तांत्रिक छाननी समितीसमोर (Technical Committee) सर्व तपशिलासह सादर करण्यात येतात. या समितीमध्ये तज्ञ तसेच ज्या विभागातून नवीन रक्त केंद्राचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे, अशा विभागातील रक्त संक्रमण अधिकारीदेखील आमंत्रित करण्यात येतात. तांत्रिक समिती प्रस्तावित रक्तकेंद्राच्या ठिकाणी,  जिल्हयात कार्यरत असलेले एकूण रक्तकेंद्र, सद्यस्थितीतील या रक्त केंद्रांचे रक्तसंकलन, जिल्हयाची लोकसंख्या, रक्ताची गरज, रुग्णालये, आयपीएचएस नियमाप्रमाणे रुग्णालयात असलेल्या खाटांची संख्या या बाबींचा विचार करुन प्रस्तावीत रक्तकेंद्राची गरज आहे किंवा कसे? याबाबत शिफारशी किंवा अभिप्राय देण्यात येतो.

संबंधित पोस्ट

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

जिल्ह्यात 2 हजार 680 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठकजलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करणार-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील