
जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न
सांगली, , (जि. मा. का.) : जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सर्व बँकांनी आपल्याकडील दैनंदिन सेवा देताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या सेवा लोकांना द्याव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिल्या. खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट सर्व बँकांनी मिळून सप्टेंबर 2024 अखेर पूर्ण करावे. सर्वच शासकीय योजनेअंतर्गत सांगली जिल्हा अग्रेसर राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी सर्व बँकांना दिल्या.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय उपव्यवस्थापक विशाल कुमार सिंग, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, आर्थिक समावेश आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रबंधक अरूण बाबू, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी घाणेकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. श्री. अजय थोरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक महेश पाटील यांच्यासह तसेच जिल्ह्यातील बँकांचे व्यवस्थापक व विविध महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मध्ये सर्व बँकांनी जलदगतीने आधार सीडिंग केल्याबद्दल सर्व बँकांचे अभिनंदन केले. तसेच उर्वरित महिला लाभार्थ्यांचे आधार सीडिंग मिशन मोडवर घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावे. योजनेसंबंधी महिला व बाल विकास विभाग, राज्यस्तरिय बँकर्स समिती यांच्या सुचनांचे पालन करावे, अशा सूचना शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिल्या.
खरीप पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, अटल पेन्शन योजना , मुद्रा योजना, पीएमएफएमई, कृषि पायाभूत सुविधा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम स्वनिधी योजना व स्टॅन्ड अप इंडिया योजनेचा आढावा यावेळी घेतला. विश्वकर्मा योजना, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वित्तीय साक्षरता केंद्र व इतर योजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.
0000



