vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सद्गुरू मिस्कीन स्वामी संस्थान मठ, माजलगाव संचलित प्रभू पंडिताराध्य वीरशैव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन  सोहळा उत्साहात संपन्न..

सद्गुरू मिस्कीन स्वामी संस्थान मठ, माजलगाव संचलित प्रभू पंडिताराध्य वीरशैव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन  सोहळा उत्साहात संपन्न..

 

छ. संभाजीनगर.सद्गुरू मिस्कीन स्वामी संस्थान मठ, माजलगाव संचलित प्रभू पंडिताराध्य वीरशैव वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास संबोधित करत श्री ष. ब्र. 108 चंद्रशेखर शिवाचार्य महाराजांनी यांनी आपल्या आशीर्वचनामध्ये वसतिगृहामागील श्री तपोरत्न प्रभू पंडिताराध्य माजलगावकर महाराजांची यांच्या समाजाभीमुख भविष्यविषयक दृष्टिकोनाची मिमांसा केली आणि भविष्यामध्ये येथील ही वास्तू पुनरनिर्माणाच्या दृष्टीने अधिक सुखसोयीनी परिपूर्ण पूर्ण करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे सुतोवाच केले.

या प्रसंगी डॉ. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, प्रा. सोमनाथ वाघमारे, श्री शिवसाम्ब हाम्पल्ले यांनी वसतिगृहातील वास्तव्य आणि त्यांच्या कार्यकिर्दीमधील येथील अधिवास कसा महत्वाचा ठरला हे विषद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री देवीदास उंचे, रमेश उंचे, दिलीप गौण्डर, विलास बिडकर, डॉ. कैलास कबाडे, वसंत पत्रे, सुभाष रुद्राक्ष, दत्तात्रय पटणे, खुशाल कारामुंगेआदींनी सहकार्य केले. या मेळाव्यास डॉ. शंकरवार, श्री मनोहर धोंडे,श्री बस्वराज चौधरी यांची उपस्थिती लाभली.

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे :अवैध वृक्षतोड केल्यास 50 हजार रुपये दंडाची वसूली-वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर आवारे  गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून हत्त्या. NCPच्या आमदारावर कुटुंबियांचे मोठे आरोप…

जैन संत आचार्य विद्यासागर जी महाराज यांना राज्यपाल बैस यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

कर्तव्यपथावर महाराष्ट्र संस्कृतीचा जयघोष; ‘गणेशोत्सव’ चित्ररथाने वेधले जगाचे लक्ष ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा ‘अशोक चक्र’ने सन्मान

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर पोलिसांना नवीन ३३ वाहनांचा ताफा; गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे बळ पोलीस दल अधिक बळकट करण्यावर भर -पालकमंत्री शिरसाट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 150 तरुणाची पुणे-मुंबई बाईक रॅली, देणार हेल्मेट जागरुकतेचा संदेश